आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
कोतकर

नेवासा, प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील बाभुळवेढे येथील सरपंच बाबासाहेब कोतकर व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात नेवासा न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

१९ नोव्हेंबर २०१९ रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ७२४/२०१९ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६, ३२४, ३५४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये बाबासाहेब कोतकर, विकास कोतकर, छाया कोतकर व राजश्री कोतकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध नेवासा येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

कोतकर

खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाचे साक्षीपुरावे, कागदोपत्री पुरावे तसेच दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयासमोर झाला. आरोपींच्या वतीने अॅड. पांडुरंग औताडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, तर त्यांना अॅड. कमलेश नवले यांनी सहाय्य केले.

उपलब्ध साक्षीपुरावे, कागदोपत्री पुरावे आणि दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाचे सखोल परीक्षण केल्यानंतर आरोपींविरुद्धचे आरोप शंकातीतरीत्या सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सबळ व विश्वासार्ह पुराव्याअभावी बाबासाहेब कोतकर, विकास कोतकर, छाया कोतकर व राजश्री कोतकर यांची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय नेवासा न्यायालयाने दिला.

कोतकर

या निकालानंतर कोतकर कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, बचाव पक्षाचे कामकाज अॅड. पांडुरंग औताडे यांनी पाहिले, तर त्यांना अॅड. कमलेश नवले यांनी मोलाचे सहाय्य केले.

कोतकर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कोतकर
कोतकर
कोतकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कोतकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!