सोनई प्रतिनिधी.मुळा एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आपल्या परिसरातच उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेच्या १२०, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स शाखेच्या ६०, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स शाखेच्या ६० तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या ६० अशा एकूण ३०० प्रवेश क्षमतेला मान्यता मिळाली आहे.या महाविद्यालयामुळे नेवासा तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी दूरच्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे.

आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची संधी मिळणार असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.ग्रामीण भागात उच्च शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने मुळा एज्युकेशन सोसायटीने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







