काँग्रेससह विविध संघठणाकडून भाजप सरकारचा निषेध
सोनई | संदीप दरंदले – लोकसभेमध्ये भाजप नेत्याकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी आज काँग्रेससह बहुजन मुक्ती पक्ष, बसपा, व इतर संघटनाकडून निषेध करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की, देशात सत्ताधारी भाजपा पार्टीतील मोठ्या फळीतल्या नेत्याकडून रोज काही ना काही चिथावनीखोर वक्तव्य करून वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात महान पुरुषांना देखील ओढवून घेण्याचे काम सोयीस्कररित्या हे नेते करताना दिसतात.
सध्या दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात भाजपचे प्रदीप पुरोहित या खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी छत्रपती शिवाजींचा अवतार होते.

मोदी हे शिवाजी महाराजच आहे असे वक्तव्य केले. पुरोहित यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर पसरले असून ठीक ठिकाणी याचा निषेधही करण्यात आला. आज नेवासा तहसील कार्यालय येथे काँग्रेससह, बहुजन मुक्ती पक्ष, बसपा, व इतर संघटना कडून छत्रपतीचा अवमान केल्यामुळे प्रदीप पुरोहित व भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पुरोहित व भाजपा सरकार विरोधात निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्या दैवत असून त्यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही ज्या खासदाराने असे वक्तव्य केले त्याची खासदारकी रद्द केलीच पाहिजे अशी मागणी केली.

शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी देशातील अनेक प्रश्न वाढती गुन्हेगारी, महिलांवरचे अत्याचार, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, बुडती अर्थव्यवस्था या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी जाणून बुजून छत्रपतीं सारख्या महान पुरुषावर अवमान कारक वक्तव्य करून लोकांचे लक्ष भरकटविन्याचे काम भाजपा नेते करत आहे.तर गणपत मोरे यांनी छत्रपती हे अठरापगड जातींचे राजे होते. आपल्या वरिष्ठ नेत्याला खुश करण्यासाठी भाजपा नेते छत्रपतीविषयी रोज काही ना काही अवमानकारक वक्तव्य करत असतात. हा महाराजाचा अवमान नसून पूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे. जाती जातीमध्ये, धर्मधर्मामध्ये तिरस्काराचे विष कालवण्याचे काम भाजप नेते करत आहे असे स्पष्ट केले. यावेळी नेवासा तहसीलदार संजय बिरादार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. निवेदनावेळी काँग्रेस अध्यक्ष आण्णासाहेब पटारे,सतीश तऱ्हाळ, गुलाब पठाण,बहुजन मुक्तीचे राम मगरे, मिन्हाज शेख, बसपाचे अध्यक्ष विकास चव्हाण, युवा नेते हरीश चक्रनारायण,सामाजिक कार्यकर्ते संजूभाऊ नारळे आदीसह आंदोलक उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.