नेवासा : तालुक्यातील सलाबतपूर परिसरात चोरटी वाळू वाहतूक करणारा आयशर पोलिसांनी गुरुवारी (दि. २७) पकडला. आयशर व वाळूसह सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कारवाईचा धडका सुरू आहे. गुरुवारी दुपारी १२ वा. सुमारास सलाबतपूर परिसरात आयशर टेम्पो चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने घटनास्थळी तातडीने पोलिस दाखल होवून पोलिस निरीक्षक धनंजय जाधव व सहकाऱ्यांनी सलाबतपूर बस स्थानकाजवळ सापळा लावून चोरटी वाळू वाहतूक करणारा आयशर ताब्यात घेतला. आयशरला पासिंग क्रमांक दिसून आला नाही.
यामध्ये २ ब्रासपेक्षा जास्त वाळू मिळून आली. आयशर व वाळू असा १४ लाख ९० हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन मुकिंदपूर येथील मुकेश अशोक लष्करे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.