नेवासा – कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची आणि शिवप्रेमींची ही मागणी मान्य करत शिवस्मारकाच्या कामासाठी तत्काळ या निधीला मंजुरी दिली. याबाबतचा शासन निर्णय तत्काळ काढण्यात येऊन तो या आमदारांना सुपुर्द करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पन्हाळा किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराजांनी या किल्ल्यावर १३३ दिवस वास्तव्य केले होते. सिद्धी जोहरने टाकलेला वेढा, बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेने दिलेले बलिदान किंवा त्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य असे ऐतिहासिक महत्त्व या किल्ल्याला आहे. मात्र तरीही या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही पुतळा नसल्याने याठिकाणी शिवस्मारक व्हावे, अशी मागणी करण्यात येत होती. स्मारकाबाबतची मागणी पहिल्यांदा करण्यात आल्यानंतर त्यावेळेसचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला होता.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.