नेवासा – तालुक्यातील खेडले परमानंद येथील आदिवासी व सर्व सामान्य महिलांच्या वतीने खेडले परमानंद येथील सुरू असलेल्या अवैद्य दारू व्यवसाय विरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. खेडले परमानंद येथे अवैद्य दारू व्यवसाय अनेक वर्षांपासून पासून सुरू असून त्यामुळे अनेक कुटुंबातील कमावती माणसं दारूच्या व्यसनाने मयत झालेली आहेत अल्पवयीन मुलं व्यसनाधीन झालेले आहेत .अनेकांचे प्रपंच उध्वस्त झालेले आहेत.त्यामुळे खेडले परमानंद येथील महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी तातडीने बैठक घेऊन पोलीस प्रशासनाला दारूबंदी संबंधी निवेदन दिले.

सदर गोष्टीचे पोलीस प्रशासनाने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी खेडले परमानंद येथील महिलांच्या वतीने करण्यात आली.यावेळी खेडले परमानंद येथील वैशाली भुजबळ, अनिता केदारी ,पुनम बर्डे,गया शिंदे,सुशीला बर्डे,शकुंतला बर्डे, मैना बर्डे ,कविता शिंदे,ताराबाई शिंदे कमल शिंदे , राणी बर्डे , दिपाली बर्डे ,आदींसह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.
सदरचे निवेदन सहाय्यक फौजदार मेढे साहेब यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
महिलांच्या या धाडसी निर्णयाचे मी स्वागत करीत आहे व त्यांना संपूर्ण सहकार्य असेल
– सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संभाजी शिंदे, खेडले परमानंद


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.