अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाई करणार – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेशेवगाव तालुक्यात पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाची मोठी कारवाई
नेवासा – परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष. आ. खाडे, मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर विशेष पथक प्रभारी अधिकारी हे शेवगांव शहरात पेट्रोलिंग करत असताना काल दिनांक १७/०६/२०२५ रोजी २२/३० वा चे सुमारास त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री व तयार करणास प्रतिबंध असताना इसम नामे १) खलील नबिब शहा २) अल्ताफ पठाण दोघे रा. नाईकवाडी मोहल्ला जामा मशीद शेवगांव ३) कुणाल संजय पिसाळ रा. भगतसिंग चौक शेवगांव ४) शहाबाज ताहेर खान पठाण ५) आफताब ताहेरखान पठाण दोघे रा बंधन लॉन्स शेवगांव असे राहते घरात गिरणीचे सहाय्याने कच्ची व पक्की सुपारी मध्ये संगुधीत तंबाखु मिसळुन मावा तयार करुन विक्री करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ श्री. संतोष आ खाडे, परि. पोलीस उपअधीक्षक यांनी विशेष पोलीस पथक व पंच यांना बोलावुन थोडकयात बातमीचा आशय समजावुन वर मिळालेल्या माहिती प्रमाणे खाजगी वाहनाने रवाना होवुन वेगवेगळया ठिकाणी पंचासमक्ष छापे टाकले असता

वर नमुद इसमांचे घरात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असे खादयपदार्थ, सुगंधीत तंबाखु,, मावा तयार करण्याचे मशीन / गिरणी असा एकुण ३,९८,६००/- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने तो पंचासमक्ष जप्त करुन मिळुन आलेले इसम नामे १) खलील नबिब शहा २) अल्ताफ पठाण दोघे रा.नाईकवाडी मोहल्ला जामा मशीद शेवगांव ३) कुणाल संजय पिसाळ रा. भगतसिंग चौक शेवगांव ४) शहाबाज ताहेर खान पठाण ५) आफताब ताहेरखान पठाण दोघे रा बंधन लॉन्स शेवगांव यांचे विरुध्द पोकों /१९३४ प्रशांत चंद्रकांत आंधळे यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे शेवगांव येथे गुन्हा रजि नं ५३९ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४, २७५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यापुढेही जिल्हयामध्ये बेकायदेशीर अवैध व्यवसाय करणा-या विरोधात अशाच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असुन अवैध व्यवसाय / धंदयाबाबत माहिती देणा-याचे नाव गोपणीय ठेवण्यात येईल.

सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे सो, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. प्रशांत खैरे, सो अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. वैभव कुलबर्गे सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर विभाग, श्री. सुनिल पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख प्रभारी अधिकारी श्री. संतोष खाडे, पोहेकॉ । ८८५ भिंगारदिवे, पोहेकॉ/ ९८१ दिनेश मोरे, पोहेकॉ /३७६ शंकर चौधरी, पोहेकॉ / ९११ दिंगबर कारखिले, पोहेकॉ । ८०३ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकॉ / ८१५ उमेश खेडकर, पोहेकॉ । ४९२ सुनिल पवार, पोहेकॉ अजय साठे, पोकॉ अमोल कांबळे, पोकॉ अक्षय भोसले, पोकॉ सुनिल दिघे तसेच पोसई खेडकर, पोहेकॉ आकाश चव्हाण, पोकों शिरसाठ, पोकों अंगरखे यांचे पथकाने केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.