25 जून 1975 देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली. जुने दिवस कधी विसरायचे नसतात ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ समाजवादी या आंदोलनात अग्रणीय होते आणीबाणीच्या समर्थनार्थ केवळ दोनच पक्ष उभे राहिले त्यातील एक होती भाकप आणि दुसरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी भूमिका घेतली एवढेच काय पण 75 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी माघार घेतली व इंदिरा गांधीना पाठिंबा दिला आणीबाणीने अनेक कुटुंबांना उदस्थ केले अनेकांनी आपले आप्तस्वतीय गमावले घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली अत्याचार या गोष्टी भारतीय जनमानस कधीही विसरू शकत नाही अशा प्रकारची लोकशाहीची हत्या पुन्हा होऊ नये म्हणून आणीबाणीच्या स्मरण भारतीय जनतेने निरंतर करण्याची गरज आहे

आणीबाणीतल्या कटू प्रसंगाची देशाने स्वतःला वेळोवेळी आठवण करून दिली तरच असा प्रसंग पुन्हा आपल्यावर रोड होणार नाही असे उदगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे पदाधिकारी दिनकरराव ताके पाटील यांनी काढले
उद्योग व्यवसाय आणि संसार प्रपंचाची घडी बसवायच्या ऐन उमेदीच्या काळात काँग्रेसने आणीबाणीत संघासह काँग्रेस विरोधकांना लक्ष करून लाखो निरपरात लोकांना 18 महिने नाशिकच्या तुरुंगात डांबले नाशिकच्या तुरुंगात 18 महिने बंदीवान राहिलेल्या छपाई व्यावसायिक 84 वर्षे दिनकरराव ताके हे अग्रणीय होते श्री ताके संघाचे स्वयंसेवक होते त्याचबरोबर जनसंघाचे पदाधिकारी होते दिनकरराव ताके यांना पुण्याच्या मोतीबाग कार्यालयातून आज्ञा आली तुम्ही ऑक्टोबर 75 पर्यंत अटक होऊ नका अटक टाळा श्री ताके आणीबाणी विरोधी संघर्ष समितीचे जिल्हा चिटणीस होते. एडवोकेटरा एडवोकेट राजाभाऊ झरकर हे अध्यक्ष होते

श्री ताके यांच्याकडे आणीबाणी विरोधी पत्रकाचा नागपूरच्या संघ कार्यालयाकडून नमुना म्हणून आले त्यात आणीबाणी विरोधी मजकूर होता जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी जिंदाबाद सिंहासन खाली करो ही जनता कीं है अशा प्रकारचे मजकूर या पत्रकात होते आणीबाणी विरोधी मजकूर होता अशा प्रकारचे पत्रक तयार करून जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोस्ट करण्याची जबाबदारी श्री ताकेवर होती त्याप्रमाणे ताके नीं स्वतःच्या प्रेसमध्ये ही पत्रके छापली प्रत्येक तालुक्याला 200 याप्रमाणे पत्रके पोहोच करून आंदोलने व्हावीत असे नियोजन केले पोलिसांचा ससे मिरा चुकवून ताकेनी ही पत्रके नगर शहरांमध्ये स्वर्गीय बाळासाहेब झिकरे कर्जत मध्ये शिवदास कानडे जामखेड मध्ये लक्ष्मीकांत पाटील श्रीगोंदा एडवोकेट पत्की संगमनेर मध्ये राधा वल्लभ कासट अकोल्यामध्ये डॉक्टर देशपांडे कोपरगाव मध्ये एडवोकेट भीमराव बडदे शिर्डी मध्ये दिलीप संकलेच्या श्रीरामपूर मध्ये उमाकांत कडुस्कर बेलापूर गावात राधेश्याम व्यास शेवगाव मध्ये विष्णुपंत देहादराय पाथर्डी मध्ये विजय कुमार छाजेड राहुरी मध्ये मोरेश्वर उपाध्ये यांच्याकडे पत्रके पोहोच केली व त्यांना सांगितले

प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी चौकामध्ये पत्रके वाटून आणीबाणी विरोधी आंदोलन करावे अशा प्रकारे जिल्ह्यात आणीबाणी विरोधी आंदोलन करण्याचे नियोजन केले त्याप्रमाणे आंदोलने कार्यकर्त्यांनी आपापल्या ठिकाणी केली ऑक्टोबर 75 पर्यंत ही आंदोलने झाली पोलिसांचे लक्ष श्री दिनकरराव ताकें वर होते श्री ताकें च्या प्रिंटिंग प्रेस ची सखोल चौकशी पोलिसांनी केली परंतु त्या ठिकाणी काही एक पुरावा सापडला नाही श्री ताके यांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय पोलिसांनी जप्त केला व त्या ठिकाणी पोलीस संरक्षण नियुक्ती केले ताकेंचा प्रपंच उध्वस्त केला पत्नी माहेरी गेली श्री दिनकरराव ताके यांना 10 ऑक्टोबर 1975 मध्ये इन्स्पेक्टर शेळके यांनी अटक केली व नेवासाच्या कारागृहात डाबून ठेवले ताके वर आणीबाणी विरोधी गंभीर स्वरूपाचे आरोप लावले त्यांना पोलीस कोठडीत ठेवले श्री ताके यांना पोलीस रिमांड काढला दररोज रात्री बारा वाजता दोन पोलीस व एक इन्स्पेक्टर यांच्यासोबत नगरमध्ये डीवायएसपी श्री भावे यांच्याकडे चौकशीसाठी आणले जात श्री भावे साहेब यांनी ताकेना धम्मक्या देत शरदराव कटककर श्री ताथेड या प्राचारकांची विचारणा केली हे सर्व कुठे आहेत ते काय करतात ताकेनी मला काही माहीत नाही असे उत्तर दिले देवळालीचे अण्णा पाटील कदम यांच्या विषयी विचारणा केली ताकेनी उत्तर दिले

मी त्यांना ओळखत नाही मला काहीच माहित नाही तुमच्याकडे आणीबाणी विरोधी काम होते संघाने काय जबाबदाऱ्या दिल्या या संदर्भात चौकशी केली अशा प्रकारे रोज रात्री बारा वाजता नगर मध्ये पोलिस मला आणत होते 10 ऑक्टोबर 75 ते 18 ऑक्टोबर 75 पर्यंत मला रिमांड होता आठ दिवस पोलिसांनी मला फार त्रास दिला मी कोणा बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना सांगितली नाही शेवटी अठरा ऑक्टोबर रोजी मला नाशिक कारागृहामध्ये पाठवण्यात आले त्या ठिकाणी मला नाशिक जेलमध्ये आणण्यात आले नाशिक जेल मध्ये सेपरेट जेलमध्ये ठेवण्यात आले प्रत्येकाला एका व्यक्तीला एका खोलीमध्ये ठेवण्यात आले संध्याकाळी सात वाजले की खोली बंद करून ठेवायचे माझ्या खोली शेजारीच वयोवृद्ध डॉक्टर मुंजे संघचालक नागपूर हे होते नाशिक जेलमध्ये जवळजवळ पंधराशे बंदिवान होते यामध्ये प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे बापूसाहेब काळदाते निहाल अहमद केशवराव धोंगडे बाबाराव भिडे काँग्रेसचे मंत्री मोहन धारिया हे देखील होते मोहन धारिया यांनी इंदिरा गांधींच्या आणीबाणी विरोधी मत नोंदवली होती त्यामुळे त्यांना अटक करून नाशिक जेलमध्ये ठेवले होते

दर रविवारी प्रमोद महाजन यांचे बंदी जणांसाठी व्याख्यान असायचे लोक त्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहिजे डॉक्टर सुब्रमण्यम हे भूमिगत होते परंतु त्यांचे दर आठवड्याला प्रमोद महाजन यांच्याकडे मेसेज यायचे अशा रीतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांचे गुप्त संदेश जायचे संघाच्या रूपाने डॉक्टर केशवराव हेडगेवार हे अवतारी पुरुष जन्माला आले त्यांच्याच प्रभावाखाली संघाने दिलेले चारित्र्य विद्वत्ता त्याग समर्पण भाव राष्ट्रनिष्ठा जगात कुठेही पाहायला मिळत नाही आज याच संघाच्या तालमीत घडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा जगाने स्वीकार केला आहे
मार्च 1977 मध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळी दिनकरराव ताके यांनी मुंबई हायकोर्टात विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते एडवोकेट बाळासाहेब आपटे यांच्यामार्फत याचिका दाखल केली की मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे एक महिन्याचा प्यारल देण्यात यावा हायकोर्टाने माझी याचिका मंजूर केली परंतु केवळ पाच दिवसाचा प्यारेल मंजूर केला आणि पाच दिवसाचा प्यारोलवर नेवासाला आलो नगरमध्ये जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांकडे माझा लोकसभेचा अर्ज भरला
माझा पॅराल पाच दिवसाचा असल्यामुळे मला पाच दिवसानंतर नाशिक कारागृहामध्ये जावे लागले पुढे निवडणुकीमध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीने पंतप्रधानांचे उमेदवार घोषित केले शेवटी त्यांचा विजय झाला अटल बिहारी वाजपेयी व अन्य नेते निवडून आले इंदिरा गांधींचा पराभव झाला व 22 मार्च 77 ला आणीबाणी उठवण्यात आली. आम्ही सर्व नाशिकच्या कारागृहातील बंदी वाहनांची मुक्तता झाली नेवासाचे विलासराव गुजराथी मोहन खराडकर मारुती आलवणे गणेश जोशी गोवर्धन छपनिया अरविंद देशपांडे दिनकरराव ताके सुरेशराव नळकांडे त्रिंबक महाजन बंडू लोणकर माधवराव मापारी बबनराव शिंदे प्रभाकर बडवे बाळासाहेब नळकांडे किसनराव नळकाडे गंगाधर शहापूरकर कल्याणदास गुजराथी असे सतरा मीसा बंदी होते आता फक्त आठ मिसा बंदी जिवंत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.