आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थी व शिक्षक झाले दंग..!
तेलकुडगाव | समीर शेख – अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील कै.संत हरिभाऊ आनंदराव घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात आनंदात संपन्न झाला. याप्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी व वारकऱ्यांचा पारंपारिक वेश परिधान करून दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले होते.त्रिमूर्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही दिंडीत उत्साहात सहभाग घेतला होता.प्रशासक मनिषा राऊत व प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला.

यानिमित्त सुरुवातीला हभप कोमल शेळके/ताके मॅडम यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व व इतिहास विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानातून समजावून सांगितला त्यानंतर विद्यार्थी व शिक्षक यांनी रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. शिक्षकांच्या फुगडीला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला.पायी दिंडी सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच पब्लिक स्कूल च्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.