सोनई –आषाढी एकादशीला पंढरपूरात लाखो वारकरी दाखल होतात व चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल ,रुक्मिणीच्या चरणी लिन होतात. मोठ्या प्रमाणावर आलेल्या वारकऱ्यांमुळे पंढरपूरच्या प्रशासनावर ताण पडतो वारकरी गावी परतल्यावर पंढरपूर मधील
मोठी अध्यात्मिक पार्श्वभूमी लाभलेल्या चंद्रभागा नदीच्या तिरावर झालेली अस्वच्छता दूर करून पवित्र नदीचा किनारा व पंढरपूरचा परिसर हा स्वच्छ करण्यासाठी आपण समाजाचे देणे लागतो या हेतूने यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मा खा यशवंतराव गडाख व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे नेवासा तालुक्यातील 200 स्वयसेवकांनी वारी स्वच्छतेची ,वारी भक्तीची
हा उपक्रम मंगळ दि 8 जुलै रोजी पंढरपूर येथे राबविण्यात आला.

सहभागी स्वयसेवकांनी शेकडो किलो प्लास्टिक, निर्माल्य संकलीत करून चंद्रभागा तीरावर स्वच्छता केली. सकाळी 7 ते दु 2 या वेळेत स्वयसेवकांनी स्वच्छता वारी हा उपक्रम राबवला. व स्वच्छ सुंदर पंढपुरचा संदेश दिला. याप्रसंगी बोलताना उदयन गडाख म्हणाले, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनईच्या 200 स्वयंसेवकांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर स्वच्छता अभियानामध्ये उस्फूर्त सहभागी होऊन स्वच्छता अभियान राबविले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी भाविकभक्त दर्शनासाठी येत असतात व त्यामुळे होणारी अस्वच्छता निर्माल्य करण्यासाठी 200 स्वयंसेवकांनी पंढरपूर स्वच्छता अभियानामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन स्वच्छतेचा एक प्रकारचा आनंदच घेतला.

श्री क्षेत्र पंढरपूर या भगवान पांडुरंगाच्या पवित्र पावन भूमीमध्ये वारीनंतर जे अस्वच्छतेचे सम्राज्य या परिसरात पसरते यावेळी स्वच्छतेमध्ये भगवंताला पाहत हे सर्व स्वयंसेवक यामध्ये सहभागी होतात.यशवंत सामाजिक प्रतिष्ठान नेहमीच विविध उपक्रम राबवित असतात यावेळी राबविलेलेल्या “वारी स्वच्छतेची वारी भक्तीची” या अभियानाद्वारे स्वच्छतेच्या माध्यमातून तरुणांवर स्वच्छतेचे संस्कार देखील नक्कीच रुजतील अशा अभियानामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभागी झाले पाहिजे.
पुढच्या वर्षी व्यापक स्वरूपात आषाढीवारी नंतर स्वच्छता वारी राबवणार असल्याचे उदयन गडाख यांनी सांगितले.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या 200 स्वयसेवकांनी 3 ट्रॅव्हल्समधून सोनई ता नेवासा येथून जात पंढरपूर येथे स्वच्छता वारी उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे वारकऱ्यांनी कौतुक केले आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.