गणेशवाडी (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे ऐन स्वांतत्र्य दिनी वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सलग सुट्या त्यात पुन्हा हायवे वरील मोठ मोठ खड्डे त्यामध्ये अपघातांची मालिका सुरुच असल्याने वाहतुकीचा तिडा कायम राहत आहे.
शुक्रवार जनावरांचा बाजार दिवस, अनेक दिवसांपासून बंद असलेले कांदा मार्केट पुन्हा सुरू झाल्याने आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मच्याऱ्यांची वाहतूक सुरळीत करताना दमछाक होत होती.
घोडेगाव मध्ये वाहतुकीचा प्रश्न कायमचा होत असल्याने येथील व्यवसायावर याचा मोठा परिणाम होत आहे. त्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक शाखेच्या कर्मच्याऱ्याची नेमणूक करण्यात यावी. – पंकज लांभाते(व्यापारी)
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा : ७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.