शनिशिंगणापूर

नेवासा – शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अॅप संदर्भातील अपहार प्रकरणी येथील सायबर पोलिसांनी नेवासा न्यायालयात नऊ संशयित आरोपींविरूध्द सुमारे अडीच हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सुमारे ७७ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. भाविकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन दर्शन अॅपच्या करारामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे तपासात उघड झाले आहे. संशयित आरोपींनी देवस्थानच्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून देवस्थानची फसवणूक केल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अॅपमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार विठ्ठलराव लंघे यांनी या अॅप करारातील संशयास्पद व्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला होता. -या मुद्याची गंभीर दखल घेतं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी -संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

शनिशिंगणापूर

तथापि, कोणताही तक्रारदार पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सायबर पोलिसांनी देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी,धर्मादाय फावडे कर्मचारी तसेच अॅप मालक यांचे जबाब नोंदविले. विविध बँक खात्यांची तपासणी करून अपहारासंदर्भातील कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात आले. या प्रकरणात सुमारे ५०० कोटी रूपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र सखोल तपासानंतर पोलिसांनी दोषारोपपत्रात ७७ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रकरण गाजल्यानंतर सायबर पोलिसांनी तपासाला गती देत देवस्थानचे कर्मचारी संजय पवार व सचिन शेटे यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान अॅप मालकांनी करारानुसार देवस्थानच्या खात्यात जमा करावयाची रक्कम थेट काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सायबर पोलिसांनी अॅप मालकांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या घोटाळ्यात अॅप मालक, देवस्थानचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून एकूण नऊ संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. देवस्थानचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी नितीन शेटे मयत झाले आहे.

Kavya

नऊ संशयित आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र

अटकेतील संजय तुळशीराम पवार (रा. सोनई), सचिन अशोक शेटे (रा. शनिशिंगणापूर) यांच्यासह नितीन सुर्यभान शेटे (मयत), उज्वल निरंज भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), वरूण दत्तात्रय पाठक (रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा), विभू जयप्रकाश अग्रवाल (रा. लखनऊ), शालिनी भारत जैयस्वाल (रा. मुंबई), सचिन रावसाहेब बनकर (रा. शनिशिंगणापूर), गोरक्ष केरूजी दरंदले (रा. शनिशिंगणापूर) यांच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

५०० कोटींचा दावा अन् प्रत्यक्षात काय ?

शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अॅप संदर्भातील अपहार हा सुमारे ५०० कोटी रूपयांचा असल्याचा आरोप केला जात आहे. अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळी देखील ५०० कोटींचा अपहार झाला असल्याचा दावा केला गेला. मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये ७७ लाखांचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. नऊ संशयित आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल करताना त्यांच्या बँक खात्यावरील व्यवहार तपासून हा अपहार उघडकीस आंणला आहे व तपास करून दोषारोपपत्र दाखल केले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनिशिंगणापूर
शनिशिंगणापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनिशिंगणापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!