
नेवासा – महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ तसेच सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम सन १९८१ तसेच राज्य शासनाने वेळोवेळी काढलेल्या मार्गदर्शक नागरिकांची परिपत्रकानुसार कामे तत्परतेने होण्यासाठी नगरपंचायतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या ठिकाणी वास्तव्य करावे, अशी मागणी उपनगराध्यक्षा शालिनीताई संजय सुखदान यांनी निवेदनाद्वारे
केली आहे.
निवेदनात म्हटले की, नेवासा शहराची सध्याची परिस्थिती पाहता शहरात सध्या पाण्याचा प्रश्न तसेच सार्वजनिक स्वच्छता प्रश्न गंभीर झालेला आहे, शहरात सार्वजनिक स्वच्छता नसल्याने अनेक गंभीर आजाराला निमंत्रण मिळत आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वास्तविक पाहता आपल्या कार्यालयातील आपण स्वतः आणि इतर व अधिकारी कर्मचारी यांनी नोकरीच्या ठिकाणी राहणे अत्यंत आवश्यक आहे. तो आपल्या कर्तव्यपरायणतेचा भाग आहे जेणेकरून आपल्या शहरांमध्ये ज्या समस्या निर्माण होत आहे. त्याची जाणीव होणे देखील गरजेचे आहे. या अगोदर नेवासा शहरात अनेकद्रा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

याआधी देखील अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने व ते स्थानिक ठिकाणी वास्तव्यास नसल्याने गंभीर प्रकार घडलेले आहे याची आपणास माहिती व जाणीव आहे तरी आपण स्वतः तसेच आपल्या कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी नेवासा शहरामध्ये नोकरी करीत असतानाही नेवासा शहरांत वास्तव्य नाही.
ही गंभीर बाब आहे. आपण नोकरीच्या ठिकाणी वास्तव्यास आहे. आपल्याला व आपले इतर अधिकारी यांना आम्ही वेळोवेळी वरील बाबीची जाणीव करून देऊन या नेवासा शहरात् वास्तव्य करावे जेणेकरून नेवासा शहराच्या प्रश्नांची आपल्याला जाण निर्माण होईल तसेच नगरपंचायतीमार्फत नागरिकांचे प्रश्न वेळेत सुटतील.

याबाबत अनेकदा तोंडी विनंती केली आहे परंतु त्याबाबत आपल्याकडून अथवा आपल्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही सुधारणा झाली नाही. तसेच आपण नेवासा नाही ही गंभीर बाब आहे त्यामुळे आंपणास आपले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेहमी शहरातच वास्तव्यास यावे अन्यथा वर नमूद केलेले नियमाप्रमाणे याबाबत योग्य त्या ठिकाणी कायदेशीर दाद मागण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

