नेवासा – तालुक्यातील रवींद्र पागिरे यांच्या कांदा पिकाची पाहणी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे व मंडल कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी केली. शेतकऱ्याबरोबर सुसंवाद केला. वेळेवर लागवड केलेल्या कांद्याची वाढ समाधानकारक असून उशिरा लागवड केलेला कांदा ढगाळ हवामानामुळे मंद गतीने वाढत आहे त्यासाठी खताची मात्रा देण्याचा सल्ला दिला तसेच जमिनीमध्ये क्षार वाढत आहेत.

त्यासाठी जिप्सम किंवा गंधक खताचा वापर करावा अशी सुचविले ढगाळ हवामान असले तरी कांद्यावर मावा किंवा तुडतुड्याचा प्रादुर्भाव आढळून आला नाही कारण रवींद्र पाटील यांनी कीटकनाशकांचा वापर केला होता. काही कांदे बुरशीजन्य रोगाने सडलेली व त्यामुळे पिवळी पडून वाळलेली आढळली त्यासाठी बुरशीजन्य औषध वापरावे असे सांगितले रवींद्र पागिरे यांनी उसामध्ये आंतरपीक कांदा घेतले आहे ते फायदेशीर असल्या संदर्भात चर्चा झाली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

