नेवासा-शिरूर (जि. पुणे) पोलिसांनी अटक केलेला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी श्यामसुंदर गुजर हाच ड्रग्ज तस्करीचा मास्टर माइंड निघाला. त्याला यापूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केलेली असून त्याचा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्यावर जप्त मुद्देमालाचा अपहार केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस हेडकॉन्स्टेबल गुजर यांच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला शासन सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत नेमणुकीस असलेल्या गुजर यांने जिल्हा पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून एक कोटी ९ लाख ७५ हजारांचे १० किलो ९७५ ग्रॅम ड्रग्स चोरल्याचे चौकशी समितीच्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुणे ग्रामीण एलसीबी व शिरूर पोलिसांनी १८ जानेवारी २०२६ रोजी संयुक्त कारवाई करीत शिरूर शहरातील डंबेनाला परिसरातील बाबुरावनगर मोकळ्या मैदानात ड्रग्ज विक्रीसाठी येणाऱ्या गॅरेज चालक शादाब रियाज शेख (वय ४१) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलो ५२ ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी आरोपी शादाब शेख याचा अहिल्यानगर एलसीबीतील गुजर याच्याशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पुणे एलसीबी व शिरूर पोलिसांनी अहिल्यानगर एलसीबीतील कर्मचारी गुजर याला चौकशी कामी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अहिल्यानगर पोलिसांनी कारवाई करून आणलेले ड्रग्ज मुद्देमाल कक्षातून चोरून विक्री केल्याच्या संशयावरून २१ जानेवारी २०२६ रोजी अटक केली. या गुन्ह्यात पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी गुजर याला पोलिस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाची तोंडी आदेशानुसार जबाबदारी देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने श्रीरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जप्त केलेले अल्प्राझोलम ड्रग्ज एक पांढऱ्या रंगाच्या गोणीत भरून ठेवले होते. गुजर याने त्या गोणीतील १०. ९७५ किलो ग्रॅम ड्रग्ज काढून त्या जागी मैदा भरला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

