नेवासा- तालुक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा संजीवन ग्रुप कार्यरत आहे या ग्रुपमध्ये शैक्षणिक कृषी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अभ्यासू सदस्य आहेत या संजीवन ग्रुपचा दर महिन्याला मेळावा घेऊन विचार मंथन केले जाते 8 फेब्रुवारी 2026 चा मेळावा दीपज्योती सभागृहात संभाजीनगर अहिल्यानगर हायवेवर पार पडला. विचारमंथन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उपप्राचार्य भैय्यासाहेब देशमुख होते. कार्यक्रमाला काशिनाथ अण्णा नवले तुकाराम मिसाळ कडबाळ कर्डिले व संजीवन ग्रुपचे 70 सन्माननीय सदस्य उपस्थित होते याप्रसंगी समाज हिताचे विचार माजी प्राचार्य वाबळे प्राचार्य गणगे दिलीपराव कोठुळे प्रा खाटीक प्रा. अशोक देशमुख अध्यक्ष साहेबराव गणगे प्राचार्य कल्हापुरे यांनी मांडले. कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी मुक्त व्यापार करार भारत व युरोपियन युनियन तसेच अमेरिका व भारत करार यासंदर्भात माहिती दिली डॉ ढगे यांनी भाजीपाला संदर्भात ठराव मांडला की भाजीपाला पिकासाठी उत्पादन खर्चावर आधारित वैधानिक आधारभूत किंमत ठरविण्यासाठी राज्यात व देशात यंत्रणा उभी करावी कारण भाजीपाला उत्पादन अत्यंत कष्टाने केले जाते तथापिरास्त भाव मिळत नसल्यामुळे उत्पादकांची खूप लूट होते या ठराव वर चर्चेमध्ये प्रा बी जी काळे प्रा वाय बी शेख रामदास कोरडे अध्यक्ष साहेबराव भणगे रामकृष्ण नवले यांनी सहयोग नोंदविला सांगोपांग चर्चा झाल्यानंतर ठराव एक मताने मंजूर करण्यात आला


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

