नेवासा-श्री मोहिनीराज यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्यावतीने नेवासा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आयोजित कुस्त्यांच्या हंगाम्यात अंतिम कुस्ती पै. सुदर्शन कोतकर व पै. अनिकेत मांगडे यांच्यात झाली. सुदर्शन कोतकर याने अनिकेत मांगडेला चितपट करुन मानाची गदा व रोख रकमेचे बक्षीस जिंकले.
कुस्ती स्पर्धेचे उदघाटन त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगे पाटील, विश्वस्त चेतन चव्हाण पाटील, सचिव मनिष घाडगे पाटील, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, पोलीस निरीक्षक महेश पाटील, यात्रा कमिटीचे अॅड. संजय सुखदान, संभाजीराव पवार, राष्ट्रीय पंच संभाजी निकाळजे, प्राचार्य सोपान काळे यांच्या हस्ते बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवून करण्यात ऑले.
यावेळी सुमतीताई घाडगे म्हणाल्या की, स्वर्गीय साहेबराव घाडगे पाटील यांना कुस्ती खेळाविषयी आवड होती. ग्रामीण भागातील मल्ल ऑलिम्पिकमध्ये देखील खेळले पाहिजे अशी त्यांची आंतरिक तळमळ होती. यासाठी त्यांनी कुस्ती स्पर्धांना पाठबळ देऊन छोट्या मोठ्या मल्लांच्या पाठीवर थाप टाकली होती. त्यामुळे मल्लांना कुस्ती खेळण्यासाठी मोठी ऊर्जा प्राप्त होत होती.

त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुस्ती खेळांना प्रोत्साहित करण्याचे काम आम्ही करू अशी ग्वाही दिली. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सर्व कुस्ती पटूंनी खिळाडूवृत्तीने खेळ करावा माऊलींच्या या भूमीत कला क्रीडा, सांस्कृतिक वैभव वाढीसाठी तसेच या भूमीला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी अशा स्पर्धांना पाठबळ द्या, स्पर्धेसाठी सहकार्य करा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनप्रसंगी निरंजन डहाळे, अनिल शिंदे, योगेश रासने, राजू काळे, बाळासाहेब खोसे, सतीश पिंपळे, गफूर बागवान, प्रकाश सोनटक्के, हिरामण धोत्रे, नगरसेवक स्वप्नील मापारी, संभाजी धोत्रे, अंकुश म्हस्के, जयदीप जामदार, राजेंद्र वाघमारे, सौरभ मुनोत, दीपक धोत्रे, संतोष कुंद्वारे जालिंदर गवळी, पप्पू डुकरे, जयंत मापारी, सुरेश लव्हाटे, बाबासाहेब पवार यांच्यासह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, नागरिक व कुस्ती प्रेमी उपस्थित होते. यात्रा कमिटी सदस्य सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर अॅड. संजय सुखदान यांनी आभार मानले. छोट्या मल्लांच्या कुस्तीने कुस्त्यांच्या हगाम्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेकडो मल्लांनी यावेळी हजेरी लावली होती.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

