भानसहिवरा (वार्ताहर) :- नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा वाचनालयाच्या वतीने माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा वाचनालयाच्या प्रांगणात झालेल्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख अतिथी म्हणून पोलीस दलातील अधिकारी संजय गायकवाड उपस्थित होते. समवेत आदर्श गाव सुरेशनगरचे मा. सरपंच पांडुरंग उभेदळ व सौ. अनिताताई उभेदळ व प्रेरणताई उभेदळ यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले.
पोलीस अधिकारी संजय गायकवाड यांनी माता रमाई यांचे जीवनकार्य आपल्या भाषणातून विषद करत माता रमाईचा आदर्श प्रत्येक माता भगिनीनी घ्यावा असे आवाहन केले. जयंती कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महिलांचा निळे फेटे घालून सन्मान करण्यात आला.

मा. सरपंच पांडुरंग पा. उभेदळ म्हणाले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खंबीर
साथ माता रमाई यांनी संकटकाळी दिली म्हणूनच आपल्या देशाला संविधान मिळाले, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांनी आपल्या कुटूंबाला उत्कर्षाकडे नेण्याचा प्रयत्न करावा व त्यांनी दिलेल्या शिकवणी नुसार वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित महिलांनी माता रमाईच्या जन्मावर पाळणा म्हटला. सदर कार्यक्रमास रुक्मिणी रंधवे, प्रमिला मिसाळ, राजीबाई रंधवे, सुमनबाई कणगरे, दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष मिराबाई जाधव, छायाताई मगर, लताबाई खंडागळे, केशरबाई गायकवाड, कविता निकाळजे, शांताबाई बर्डे, लिलाबाई शेगर, मंगल उभेदळ, अंजना शेगर, सरसाबाई शेगर,
सीताबाई शेगर, लक्ष्मी शेगर, सोनाली निंबाळकर, मनिषा चव्हाण, सुनीता चव्हाण,
सोनाबाई शिंदे आदी महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

