आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
घरकुल

नेवासा – आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पुढाकाराने तसेच मा. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने जप्त केलेली अंदाजे १८० ब्रास वाळू ३७ लाभार्थ्यांना विना शुल्क वितरीत करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शासन अधिसूचना क्रमांक गौखनि १०/०२१५/प्र.क्र.९२/ख, दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ नुसार स्वामित्वधन न आकारता वाळू उपलब्ध करून देण्याच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत नेवासा शहरात आज अखेर एकूण ३६८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी २७८ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. सन २०१८-१९ मध्ये मंजूर झालेल्या काही घरकुलांचे बांधकाम वाळूच्या अभावामुळे व आर्थिक अडचणींमुळे रखडले होते. या उपक्रमामुळे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्णत्वास जाणार असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. वरील लाभार्थ्यांचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी अभिनंदन केले आहे.

वाळू वाटप कार्यक्रमावेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील, मुख्याधिकारी निखिल फराटे, नायब तहसीलदार बोरुडे, नगरसेवक अंकुश म्हस्के, कृष्णा परदेशी,गौण खनिज लिपिक संतोष लहारे, नगरपंचायत घरकुल अभियंता राहुल आढाव यांच्यासह लाभार्थी श्रीमती अनिता साळुंके, श्रीमती सविता कुसकर, श्रीमती शैला मोरे, श्रीमती शितल बेळे आणि श्रीमती वंदना इंगळे उपस्थित होते.

घरकुल

या सामाजिक उपक्रमामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून शासनाच्या गृहनिर्माण धोरणावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

अहिल्यानगर येथे मागील आठवड्यात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू शासनाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार विठ्ठल लंघे यांनी केली होती.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घरकुल
घरकुल
घरकुल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घरकुल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!