श्रीरामपूर – येथील ध्येयतरंग एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत माहे – फे ब्रुवारीमध्ये नुकत्याच घेण्यात आलेल्या आय एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत श्रीरामपूर येथील विन्सेन्शन मिशन सर्विस सोसायटी संचलित डी. पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या विद्यार्थिनी कु. श्रद्धा सचिन हिंगे (इ. नववी) हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. श्रुती सचिन हिंगे (इ.चौथी) हिने जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला.

या भगिनींचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी पुन्हा एकदा डिपॉल स्टेट बोर्ड स्कूलच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला आहे व संस्थेचे नाव राज्यस्तरावर पोहोचविले आहे. यावेळी त्यांना आई-वडील व सर्वच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
फादर फा. फ्रँको, या यशाबद्दल त्यांचे श्रीरामपूर डिपॉल शाखेचे व्यवस्थापक सिजो, प्रशासक प्राचार्या सिस्टर ब्लेसा, टीचर सोनाली झांजरी, सचिव मॉली कुथूर, वरिष्ठ लिपीक रवींद्र लोंढे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







