आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पाऊस

सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही,पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान; सरसकट नुकसान पंचनामे करण्याची मागणी

पाचेगाव फाटा (वार्ताहर)नेवासा तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या बेलपिंपळगाव गावात सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला,त्यात रब्बी हंगामातील पिके हातातून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
या अगोदर देखील बेलपिंपळगाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली असताना त्यातच गहू,कांदा,मका व फळबाग आडवे झाले होते.त्यात गहू पिकांचे पंचनामे करण्यात येऊन अहवाल प्रशासनाच्या कार्यलयात सादर झाला तोच पुन्हा राहिलेल्या पिकांचे सोमवारच्या दिवशी सायंकाळी झालेल्या वाऱ्यासह काहीप्रमाणात गारा पडून हात तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हजेरी लावून ओडून घेतल्याचे चित्र सध्या बेलपिंपळगाव दिसून येत आहे.

पाऊस


या जोरदार वाऱ्यामुळे सोमवारी रात्री विजेचे खांब पडल्याने बेलपिंपळगाव अंधारमय झाले होते, पण मंगळवारी महावितरणचे कर्मचारी यांनी युद्धपातळीवर काम करीत खांब उभे करून विधुत लाइन सुरळीत करून मंगळवारी सायंकाळ पर्यंत चालू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी महावितरण कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
या वाऱ्यामुळे या भागातील काही भाऊसाहेब} साठे,भारत साठे,राजेंद्र साठे या तिन्हीचे घराचे पत्रे उडून गेले तर अंकुश सुरुशे यांच्या राहत्या घरावर झाड कोसळून नागरिकांचे नुकसान झाले आहे,पण सुदैवाने जीवितहानी न झाल्याने पुढील अनर्थ टळला. या जोरदार वाऱ्यामुळे बेलपिंपळगाव परिसरात मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाने आता सर्व पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी सरपंच सह ग्रामस्थांनी केली आहे.

पाऊस


यावेळी घटनास्थळी बेलपिंपळगावचे सरपंच किशोर गारुळे,तंटामुक्ती अध्यक्ष भीमजी साठे,कामगार पोलीस पाटील,संजय साठे,योगेश शेळके,अरुण कोटूळे आदी ग्रामस्थांनी धाव घेत त्या नागरिकांना धीर देत प्रशासन मार्फत नुकसान पंचनामे करण्यासाठी तसेच मदत मिळून देण्यासाठी प्रयन्त करू असे आश्वासन देण्यात आले.

पाऊस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाऊस
पाऊस
पाऊस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!