आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
प्रहार

नेवासा : प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्ह्यात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत नेवासा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती म्हणून Bachchu Kadu यांची उपस्थिती लाभली.
गेल्या अनेक वर्षांपासून बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग हक्क, बेरोजगारी, शिक्षण व आरोग्याच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलन उभारले आहेत.

प्रहार

शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून त्यांनी लढा दिला असून हजारो कार्यकर्त्यांना संघटित करून प्रभावी जनआंदोलन उभे केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाने सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका बजावली आहे.
शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्यात बच्चूभाऊ कडू यांच्या सोबत सक्रिय सहभाग नोंदवलेल्या कार्यकर्त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. “कार्यकर्त्याशिवाय नेता अपूर्ण आहे” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यामध्ये नेवासा तालुक्यातील पांडुरंग नवले, सचिन साबळे व तब्बू शेरकर यांना प्रहार कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

प्रहार


या पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांचे प्रहारचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, युवक जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग औताडे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, दिव्यांग जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा संघटक जालिंदर आरगडे, तालुका कार्याध्यक्ष अनिल विधाटे, युवक तालुका अध्यक्ष विकास कोतकर, धरणग्रस्त प्रमुख नागनाथ आगळे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे संघटनात्मक बळकटी मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

प्रहार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रहार
प्रहार
प्रहार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रहार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!