अपघात

पुणे जिल्ह्यातील ओतूर जवळ झाला अपघात!

नेवासे (प्रतिनिधी) – शहाली पिंप्री (ता.नेवासे) येथील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीच्या बसला गुरुवार (दि.12) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ओतूर येथील डुंबरवाडीजवळ चालत्या बसचे टायर फुटून झालेल्या या अपघातात बस पलटी होऊन यामध्ये दोन शिक्षकांसह एक शिक्षिका तसेच 11 शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघाताची माहिती मिळताच शहाली पिंप्री गावचे सरपंच सतिष चंदन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थी व शिक्षकांची भेट घेवून मदतीचा हात दिला.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,शहाली पिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरी ते सातवी या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गुरुवारी पहाटे शिवनेरी, लेल्यांद्री,ओझरला जाण्यासाठी निघालेली असतांना या बसला ओझरजवळ अपघात होऊन यामध्ये 14 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही समावेश असून अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी चालकाला डुलकी लागल्यामूळेच हा अपघात झाल्याची चर्चा अपघातस्थळी सुरु होती.
नेवासे तालुक्यात शहाली पिंप्री हे गाव असून नेवासे बस आगाराऐवजी शेवगांव आगाराची बस (क्र.एम.एच 14 एल. एक्स.6747) ही या शालेय विद्यार्थ्यांना घेवून गेलेली असून नेवासे तालुक्याच्या सहलीत शेवगाव आगाराची ही बस कशी आली अशीही चर्चा आता सुरु झालेली असून या झालेल्या अपघातात एका विद्यार्थांच्या बरगडीला तसेच एका विद्यार्थ्यांच्या हाताचा कोपरा फॅक्चर झाल्याची माहिती समोर आलेली असून या बसचे टायर फुटन या बसने पलटी घेतल्यामुळे ही बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली मात्र सुदैवाने या अपघातात दुर्दैवी घटना घडलेली नसून अपघातग्रस्थांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती सरपंच सतिष चंदन यांनी दिली.

अपघात
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपघात
अपघात

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!