नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजळगाव-ने येथील डिप्लोमा इन फार्मसी (प्रथम वर्ष) च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने विविध ठिकाणी अध्ययन भेट आयोजित करण्यात आली होती.
या अध्ययन भेटीची सुरुवात महाविद्यालय परिसरातून संकुलाचे मुख्य प्रशासक सचिन कर्डिले सर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय बुधवंत सर हेही उपस्थित होते.
या अध्ययन भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी खालील ठिकाणांना भेट दिली

ऋषी मेडिकल, शेवगाव
वृद्धाश्रम, शेवगाव
औषधी वनस्पती उद्यान, संत एकनाथ आयुर्वेदिक महाविद्यालय, शेवगाव
जल शुद्धीकरण केंद्र, शेवगाव
या भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना औषध साठवणूक व वितरण प्रक्रिया, मेडिकल स्टोअर व्यवस्थापन, औषधी वनस्पतींची ओळख व त्यांचे औषधी उपयोग तसेच जल शुद्धीकरण केंद्रात पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाची वैज्ञानिक प्रक्रिया याबाबत प्रत्यक्ष व सखोल माहिती मिळाली.
वृद्धाश्रम भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संवेदनशीलता व जबाबदारीची भावना निर्माण झाली.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनोद भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमासाठी डिप्लोमा विभाग प्रमुख डॉ.सुरज गिऱ्हे, प्रा.विशाल फलके, प्रा.राजेंद्र कळमकर, प्रा. सनोबर शेख तसेच प्रा. पूनम घाडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
अशा प्रकारच्या अध्ययन भेटींमुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान अधिक समृद्ध होऊन त्यांना भविष्यात एक सक्षम, जबाबदार व समाजाभिमुख फार्मासिस्ट म्हणून घडण्यास मदत होईल असा विश्वास संस्थेकडून व महाविद्यालयाकडून व्यक्त करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

