आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शनि जयंती

सात ते आठ लाख भाविकांच्या गर्दीत वाहतूक व्यवस्थेला मोठा हातभार; सामाजिक बांधिलकीचे उदाहरण

शनि जयंती


घोडेगाव— शनिशिंगणापूर येथे शनि अमावस्या आणि शनि जयंती एकत्र आल्याने यंदा अभूतपूर्व गर्दी उसळली होती. तब्बल सात ते आठ लाख भाविक शनिदर्शनासाठी दाखल झाल्याने वाहन पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले होते. अशा परिस्थितीत सामाजिक जाणीव जपत शिंगणापूरचे राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील अंड. सयाराम पाटील बानकर यांनी पुढाकार घेत भाविकांसाठी स्वतःची शेती पार्किंगसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यांच्या या जनहिताच्या कार्याची दखल घेत शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनकडून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

शनि जयंती


पोलीस स्टेशनकडून देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रानुसार, मोजे कांगोणी शिवारातील गट क्रमांक १८९ मधील सुमारे २ हेक्टर ४१ आर शेती जमीन भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेमुळे हजारो वाहनधारकांना सुरक्षित आणि सोयीस्कर पार्किंग मिळाले. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यास आणि नियोजन सुरळीत ठेवण्यास मोठी मदत झाली.
विशेष म्हणजे, शनि जयंतीसारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाहतूक आणि पार्किंग ही प्रशासनासमोरील गंभीर समस्या असते. अनेकदा पार्किंगअभावी भाविकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. अशा वेळी स्थानिक नागरिक आणि सामाजिक घटकांचा सहभाग प्रशासनासाठी महत्त्वाचा ठरतो शनिशिंगणापूरचे पोलीस पाटील एडवोकेट. सयाराम पाटील बानकर यांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत परिसरात व्यक्त होत आहे.

शनि जयंती


शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी या कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देत गौरव केला. त्यांनी जनहित, सामाजिक सहकार्य आणि सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्थेसाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.
शनि जयंतीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांमध्ये केवळ प्रशासनावर सर्व जबाबदारी टाकून चालत नाही. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांचे सहकार्यही तितकेच आवश्यक असते. सयाराम पाटील बानकर यांनी स्वतःची जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली, हा केवळ सामाजिक उपक्रम नसून लोकसहभागातून प्रशासनाला मिळालेली प्रभावी मदत ठरली आहे. भविष्यात अशा मोठ्या उत्सवांमध्ये प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित होत आहे. चौकट. स्वर्गीय बानकर भाऊंचे संस्कार. स्वर्गीय बानकर भाऊंनी देवस्थानची चाळीस वर्ष निस्पृह सेवा केली म्हणून शनि देवाने त्यांना आपल्या जवळ घेऊन संत बनवले हीच सेवाभावी वृत्ती अँड साईराम बनकर यांनी जोपासली त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे आगामी विश्वस्त मंडळामध्ये बानकर कुटुंबातील एक विश्वास असावा अशी नेवासा तालुक्यातील अनेकांची इच्छा व्यक्त केली.

शनि जयंती
शनि जयंती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनि जयंती
शनि जयंती
शनि जयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनि जयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!