आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
नगरसेवक

नेवासा नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्याविरोधात दाखल झालेल्या विविध तक्रारींची निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कार्यभारापासून दूर ठेवण्याची मागणी उपनगराध्यक्षा सौ. शालिनी संजय सुखदान यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्यासह विविध वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

उपनगराध्यक्षा

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या कार्यकाळातील कथित आर्थिक व प्रशासकीय अनियमितता, शासकीय अभिलेखांमधील फेरफार तसेच इतर गंभीर बाबींविषयी जिल्हाधिकारी, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन, विभागीय आयुक्त, नगर विकास विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आदी सक्षम प्राधिकरणांकडे वेळोवेळी लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

या तक्रारींची सखोल चौकशी सुरू असताना श्री. फराटे पुन्हा नेवासा नगरपंचायतीत हजर होणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नगरपंचायतीतील महत्त्वाच्या अभिलेखांमध्ये व कागदपत्रांमध्ये हस्तक्षेप अथवा फेरफार होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

उपनगराध्यक्षा

उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांनी आपल्या गटातील ११ नगरसेवकांच्या वतीने पुढील प्रमुख मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. त्यामध्ये मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्याविरोधातील तक्रारींची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कार्यभारापासून दूर ठेवणे, नगरपंचायतीतील सर्व अभिलेख व दस्तऐवज सुरक्षित ठेवणे तसेच चौकशी प्रक्रियेला गती देणे यांचा समावेश आहे.

दरम्यान, श्री. फराटे यांनी नेवासा नगरपंचायतीत हजेरी लावल्यास संविधानिक व लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवून शांततामय आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

उपनगराध्यक्षा

या निवेदनामुळे नेवासा नगरपंचायतीतील राजकीय व प्रशासकीय घडामोडींना वेग आला असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

उपनगराध्यक्षा
उपनगराध्यक्षा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

उपनगराध्यक्षा
उपनगराध्यक्षा
उपनगराध्यक्षा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

उपनगराध्यक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!