
घोडेगाव– लोहगाव रोडवरील धनगरवाडी शिवारातील अवैध गावठी दारू अड्यावर पोलीसांनी छापेमारी केली. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १७ रोजी येथील सिताराम काशीनाथ साळवे (वय.४५) हा लोहगाव रोडवरील धनगरवाडी शिवारात असणाऱ्या हाॅटेल दोस्ती मध्ये विनापरवाना बेकायदा तयार हातभट्टीची दारू विक्री करताना मिळून आला. दोन हजार रुपये किंमतीची वीस लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू असा मुद्दे माल त्या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आला. पोलीस काॅस्टेबल शंकर कासार यांच्या फिर्यादी वरुन संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा र. नं. ६१/२०२६ महाराष्ट्र दारू बंदी कायदा ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र पवार हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

