आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जखमी

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील पांढरीपूल परिसरात भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने पादचारी तरुणाला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला आहे. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. ११) फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर रोडवरील वैभव भेळ सेंटरजवळ, पांढरीपूल (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथे ही घटना घडली. फिर्यादी अक्षय दत्तात्रय आढाव (वय २५, रा. घोडेगाव, ता. नेवासा) हे पायी रस्ता ओलांडत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

त्यामुळे अक्षय आढाव हे जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतर संबंधित वाहन चालकाने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार वाहन चालक व संबंधित वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पहाटेच्या वेळी वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

जखमी

दरम्यान, पांढरीपूल परिसरात वेग नियंत्रणासाठी कडक उपाययोजना कराव्यात, तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. फरार चालकाचा शोध लावून कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

जखमी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जखमी
जखमी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जखमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!