
नेवासे – राज्य शासनाच्या ‘निरंतर वीज’ योजनेतून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विशेष पुढाकाराने येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोरील असलेल्या चक्रनारायण वसहतीला नविन विद्युत रोहीत्र शनिवार (दि.21) रोजी खासदार वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसविण्यात आल्यामुळे या परिसराचा विजेचा महत्वाचा मोठा प्रश्न निकाली निघाल्यामुळे या चक्रनारायण वसाहतीतील नागरिकांनातून खासदार वाकचौरे यांचे कौतुक केले जात आहे.

या चक्रनारायण वसाहतीतील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या विद्युत रोहित्राचे लोकार्पण खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी करून येथील विजेचा प्रश्न सोडविल्यामुळे जनतेतून खासदार वाकचौरे यांच्या कामाचे जनतेतून मोठे कौतुक केले जात आहे.

याप्रसंगी नगरसेवक महेश लोखंडे,प्राचार्य आर.के आगळे,चांगदेव शेजूळ,शिवसेना उप तालुका प्रमुख मुन्ना चक्रनारायण,आत्माराम बुचडे,शहरप्रमुख नितीन जगताप, इंजिनीयर आदित्य चक्रनारायण,बाळासाहेब सोनवणे माऊली लष्करे,रमेश लष्करे व चक्रनारायण वसाहतीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

