
नेवासा – तालुक्यात ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासे येथे ६४२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. श्री समर्थ सदगुरु के बाबा विद्यालय, उस्थळ येथे २४८ विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिजामाता माध्यमिक विद्यालय, ज्ञानेश्वर नगर भेंडा येथे ६३२ विद्यार्थी परीक्षा देणार असून गुरुदास भगवंतगिरी महाराज माध्यमिक विद्यालय, जळके येथे ५६६ विद्यार्थ्यांची नोंद आहे.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, करंजगाव येथे २७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच श्री दादासाहेब धाडगे पाटील माध्यमिक विद्यालय येथे ४२० विद्यार्थी, श्री हनुमान विद्यालय, बेलपिंपळगाव येथे २६९ विद्यार्थी, कुकाणा इंग्लिश स्कूल येथे ५४८ विद्यार्थी आणि ज्ञानेश्वर विद्यालय, खरवंडी येथे २६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
विद्यार्थी दरम्यान, घोडेगाव विभागातील परीक्षा केंद्रांवरही विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. श्री घोडेश्वर विद्यालय, घोडेगाव येथे ३८० विद्यार्थी, शनेश्वर विद्यालय, साई येथे ३४० विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कूल, जांभूळ येथे ४५६ विद्यार जवाहर विद्यालय, चांदा येथे ३४९ विद्यार्थी तसेच ज्ञानप्रबोधिनी पब्लिक स्कूल, पिंपरी येथे २२९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

घोडेगाव विभागातील या पाच केंद्रांवर एकूण १,७५४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दोन्ही विभागांतील सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ, बैठक व्यवस्था व अन्य सोयी-सुविधांची पूर्तता करण्यात आली असून परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर यांनी दिली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

