सोनई : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा २०२४ पूर्वी करण्यात आली होती. मात्र अद्याप स्वतंत्र महामंडळाची स्थापना न झाल्याने तेली समाजात नाराजी व्यक्त होत आहे. दोन महिन्यांत ‘तेली समाज विकास महामंडळ’ कार्यान्वित न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अहिल्यानगर जिल्हा तेली समाज व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या वतीने देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती.
मात्र दोन वर्षे उलटूनही कार्यवाही न झाल्याने समाजबांधवांत तीव्र असंतोष आहे. निवेदनात तेली समाज आर्थिक अडचणीत सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे. युवक-युवतींसाठी शैक्षणिक कर्ज, व्यवसायासाठी भांडवल, स्वयंरोजगाराच्या संधी आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र महामंडळ आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. संबंधित मागण्यांचे निवेदन तालुका तहसीलदारांकडे सादर करण्यात आले. यावेळी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी व कोपरगाव, संगमनेर, अकोले, नेवासा परिसरातील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







