आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बनावट कागदपत्रे

गणेशवाडी– नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथे सामाईक बांधावरील झाडे तोडण्यास विरोध केला म्हणून पिता पुत्रास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. २५ रोजी दुपारी फिर्यादी यांच्या शेती गट नं. १२६ मध्ये असलेल्या सामाईक बांधावरील झाडे आरोपी गणेश लक्ष्मण जाधव, लक्ष्मण काशीनाथ जाधव, सागर द्वारकानाथ जाधव, सुनिता लक्ष्मण जाधव, ओमकार लक्ष्मण जाधव, मिना राजेंद्र तोडकर, धीरज अशोक माकोणे सर्व राहणार शिरेगाव हे तोडत असताना त्यांस फिर्यादी सुजित कांतीलाल तुवर व वडील कांतीलाल धर्माजी तुवर यांनी विरोध केला असता त्यांना गैरकायद्याचे मंडळी जमवून शिवीगाळ करत कुऱ्हाडी ने व लाकडी दांड्याने मारहाण केली व दमदाटी केली असल्याची फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्या नुसार संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा र. नं. ७४/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), १८९(२), १९१(२) (३), ११५(२), ३५२,३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अंकुश दहीफळे हे करत आहेत.

झाडे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

झाडे
झाडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

झाडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!