गणेशवाडी— दि. २७ रोजी अर्जुन मारुती ओव्हळ (वय, ६६) रा मुळा कारखाना यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की दि. २० ते २७ रोजी फोनद्वारे व फिर्यादी यांच्या राहत्या घरी महिला आरोपी भाग्यश्री जाधव (गायधने) राहणार श्रीरामपूर यांनी फिर्यादी यांना फोन व मेसेज करून फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी अनिकेत अशोक नेटके, किशोर जयसिंग साळवे,कृष्णा सुभाष वैरागर, गौरव अरुण वाघमारे सर्व राहणार ब्राम्हणी यांनी दहा लाखांची मागणी केली. पैकी दहा हजार रुपये घेऊन उर्वरित रक्कमेसाठी पुन्हा फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उर्वरित रकमेची मागणी केली.
ओव्हळ यांनी सोनई पोलीस ठाणे गाठून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा र. नं. ७६/२०२६ बिएन एस चे कलम ३०८(२), १३७,३३२,३५१(२) (३) ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी तात्काळ पथकातील पोलीस अंमलदार यांना आरोपींच्या शोधकामी पाठवुन आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. आरोपींना नेवासा येथील न्यायलया समोर हजर केले असता त्यांना अधिक तपासा कामी तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अहील्यानगर सोमनाथ घार्गे, सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब बाचकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा तमनर, पोलीस काॅस्टेबल निखिल तमनर, पोलीस काॅस्टेबल गणेश गावडे यांनी केली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







