खंडणी
खंडणी

आपला जिल्हा – पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाला खोट्या गुन्ह्याची भीती दाखवत ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अज्ञात भामट्यांविरुद्ध अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विनीत नानासाहेब जाधव (वय ३८, रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

खंडणी

फिर्यादी विनीत जाधव यांना २९ जुलै २०२५ ते ३० जानेवारी २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून वारंवार फोन येत होते. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवले आणि जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

खंडणी

हा खोटा गुन्हा टाळण्यासाठी संशयित आरोपींनी त्यांच्याकडे ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. सततच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या जाधव यांनी अखेर सायबर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन मोबाईल क्रमांक धारक अनोळखी व्यक्तींसह त्यांच्या इतर अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले अधिक तपास करीत आहेत.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खंडणी
खंडणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खंडणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!