
मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय,संगणकशास्त्र व डेटा सायन्स विभागाचा पुढाकार..
अहिल्यानगर: तंत्रज्ञानाच्या युगातील भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने,जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI)या विषयावर एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे,अशा स्वरूपाचे हे अहिल्यानगरमधील पहिले प्रॅक्टिकल वर्कशॉप असणार आहे.संस्थेचे विश्वस्त मा.श्री.क्षितिज घुले पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा साकारली जात आहे.मंगळवार दि.१० मार्च २०२६,सकाळी १० वाजता लोकनेते मारुतरावजी घुले पाटील सभागृहामध्ये ही एकदिवसीय कार्यशाळा पार पडणार आहे.
“या कार्यक्रमात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर सौ.ज्योती गाडे आणि उपमहापौर श्री.धनंजय जाधव यांचा सन्मान करण्यात येणार आहे.”या कार्यशाळेसाठी नामांकित कंपन्यांमधील तंत्रज्ञान तज्ज्ञ विद्यार्थ्यांना एआय (AI) मधील बारकावे आणि प्रत्यक्ष कार्यप्रणाली शिकवणार आहेत.महाविद्यालयातील ‘संगणकशास्त्र’ (Computer Science) आणि ‘डेटा सायन्स’ (Data Science) विभागातील विद्यार्थी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत.

“विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता त्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान हाताळता आले पाहिजे,या हेतूने आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले आहे,” असे मत डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी व्यक्त केले.या उपक्रमामुळे नगरमधील शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचे एक नवे दालन उघडले जाणार आहे. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन प्राचार्य डॉ.ए.के.पंदरकर, उपप्राचार्य प्रा.पी.ए.फटांगरे आणि कार्यशाळा समन्वयक डॉ. एम.ए.शेख यांनी केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







