नेवासा-नोकरी निमित्ताने पुणे येथे कार्यरत असलेले नेवासे शहराचे भूमिपुत्र श्री. श्रीकांतजी मापारी , यांच्या मुलाचा चि. ऋषिकेश आणि चि.वैदेही विनायक पत्की यांचा शुभविवाह नुकताच संपन्न झाला. या विवाहाच्या निमित्ताने प्लास्टिक, थर्माकोल, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, डिस्पोजेबल ग्लास, कप, डी.जे. इत्यादीचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला. मापारी तसेच वधूकडील पतकी परिवारिनेही साथ दिली. मंगलकार्यालय व्यवस्थापनाने (एमडीएस बँक्वेट हॉल) हिरिरीने सहभाग घेतला, एक हजार स्टिलचे नवीन ग्लास घेतले, काचेचे ग्लासही उपलब्ध केले.

सर्व निसर्ग मित्रांनी नियोजन केले. उपस्थितीतांनी सहकार्य केले, आणि हा विवाह पर्यावरण पुरक ठरला.
अनेक नातेवाईक, मित्रपरावाराने अभिप्राय पाठवले.
त्यापैकी एक प्रातिनिधिक
आपुलिया हिता जो असे जागता
धन्य मातापिता तयाचिया !!
श्रीकांत…आपल्या सर्वांचा मित्र..त्याच्या “मुलाचे लग्न”…..लग्न सोहळा खूपच सुंदर पार पडला.
प्रेशियस ऐ सी हॉल….
कुठलीही उथळ सजावट.. स्क्रिन..रेकॉर्डिंग…नाही.
अत्यंत शांत…मंगलमय पारंपारिक सनई चौघडा..
कोणाचाही नाम उल्लेख आणि सत्कार नाही , फेटे नाही. निवेदकाचे डोकं उठवणारे निवेदन नाही.
पर्यावरणपूरक व अत्यंत साधं परंतु रिच डेकोरेशन…
मुळात नवरदेव व नवरी मुलीनी सजगपणे.. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर व अट्टाहास करत लग्न सोहळा पार पाडला.
सध्याच्या इव्हेंटच्या उथळ माहोलच्या पार्श्वभूमीवर वधू व वर यांचा त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा ओरा दिसून आला.
उपस्थिती… श्रीकांतने पुण्यात येऊन काय संचित केलं???.. त्याचं ते प्रतिबिंब होतं.

वै.भाऊ म्हणजे श्रीकांत चे वडील एक सुजाण नागरिक,निष्ठावान वारकरी,आदर्श शेतकरी व सच्चा देशभक्त आपली मुलं सुसंस्कारी व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणारी असावीत..या भूमिकेतून शिस्त व स्वावलंबनाचे धडे देणारे श्रीकांत ,नरेंद्र व महेश आज समाज जीवनात “ज्या पद्धतीने कार्यरत” आहेत ते आपणा समोर आहे.
मुलाच्या विवाहप्रीत्यर्थ श्री विवेकानंद आश्रम , यशवंत स्टडी क्लब , माऊली गोशाळा , वसुंधरा प्रतिष्ठान , नोबेल ग्रुप या संस्थांना त्यांनी मदत निधी दिला तो ही मोठ्या प्रमाणात आपल्या जन्मभूमीतील संस्थांना
स्वधर्म,स्वदेश,गोरगरीब समाजा प्रतीची आपुलकी जिव्हाळा.. संवेदनशीलता.. वडिलांचे संस्कार व मिराशी त्यामागे आहे.भेटवस्तू ही नम्र पणे नाकारल्या
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मातोश्रींचा “सहस्रचंद्रदर्शन सोहळा”ही या भावंडांनी साजरा केला


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






