चेगाव फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव मध्ये वादळी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, ज्वारी, हरभरा, मका या पिकांचे तसेच चिकू व आंबा या फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी काढणीला आलेले पीक आडवे झाले असून, भाजीपाला पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील गहू, कांदा, कांद्याचे ढोकळे, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे.

काढणीला आलेली पिके खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या परिसरात दुपारपर्यंत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत कडाक्याचे उन्ह होते, पण दुपारनंतर आकाशात हळूहळू ढगाळ वातावरण तयार होऊन संध्याकाळी आठच्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी सुरू झाल्या. विजेच्या मोठ्या आवाजाने काहीकाळ तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले होते.
पंचनामे करुन भरपाई द्या
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी देता येईल या दृष्टिकोनातून पाऊल उचलावे.- कृष्णा शिंदे माजी सरपंच, बेलपिंपळगाव


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







