आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
नामदार चषक

उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न.

सोनई | सुनिल सोपानराव दरंदले – येथील सीनिअर कॉलेजच्या मैदानावर झालेल्या ‘नामदार चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेत सीएसके नेवासा संघाने विजेतेपद पटकावले आहे.
उदयन गडाख युवा मंच, जगदंब ग्रुप,गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीने युवा नेते उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त हि स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये नेवासा तालुक्यातील १२ विविध नामवंत क्रिकेट संघ सहभागी झाले होते.दररोज होणाऱ्या डे -नाईट मॅचेस पाहण्यासाठी नेवासा तालुक्यातील गावागावांतून मोठया संख्येने तरुण व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
सीएसके नेवासा व जनता गॅरेज नेवासा यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात सीएसके नेवासा संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकात ६७ धावा काढून जनता गॅरेज संघावर आठ धावांनी विजय मिळविला.


प्रथम बक्षीस सीएसके नेवासा ६१ हजार १११ रु बक्षीस, द्वितीय क्रमांकाचे जनता गॅरेज ४१ हजार १११ रु बक्षीस तसेच तृतीय क्रमांकाचे जगदंब सोनई ३१ हजार १११ रु बक्षीस व चतुर्थ क्रमांचे २१ हजार १११ बक्षीस शिवम फायटर संघाने पटकावले. एलईडी व्हॅनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात आली. युट्युब लाईव्हच्या माध्यमातून १५ हजार क्रिकेट प्रेमींनी फायनल मॅचचा आनंद घेतला.
या स्पर्धेतील बक्षीस प्राप्त संघांचा व उत्कृष्ट फलंदाज म्हणून अक्षय ज-हाड, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सौरभ गायकवाड, मॅन ऑफ द सिरीज म्हणून सागर रेवाळे व अखेरचा सामनावीर म्हणून पियुष घोलप यांचा सत्कार प्रवीण गडाख, राजेंद्र गुगळे, नंदकुमार पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व बक्षीसे देऊन करण्यात आला.

नामदार चषक

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांचे उदयन गडाख युवा मंचच्या वतीने शाल व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.शेवटी आयोजक कमिटीच्या वतीने उदय पालवे यांनी आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नामदार चषक
नामदार चषक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नामदार चषक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!