आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
घरकुल

नेवासे तालुक्यात प्रशासनाची धडक मोहीम; १ मार्चची डेडलाईन


नेवासा-
घरकुल मंजूर होऊन वर्षभर उलटूनही काम सुरू न करणाऱ्या नेवासा तालुक्यातील तब्बल ५ हजार लाभार्थ्यांना प्रशासनाने अखेर शेवटचा इशारा दिला. ३१ मार्चपर्यंत घरकुलाचे बांधकाम सुरू न करणाऱ्यांची घरकुले रद्द करण्यात येणार असून मिळालेल्या अनुदानाचीही वसुली केली जाणार, असा इशारा पंचायत समिती प्रशासनाने दिला आहे.

घरकुल

तालुक्यात सुमारे ५ हजार लाभार्थ्यांनी बांधकामालाही सुरुवात केलेली नाही. या पार्श्वभूमीवर १८ मार्च रोजी धडक तपासणी मोहीम राबवण्यात येत असून सोनई ग्रामपंचायत हद्दीमध्ये चार विशेष पथकांनी २०० लाभार्थ्यांच्या घरी पाहणी केली. नेवासा बुद्रुक येथेही चार पथकांनी २१६ लाभार्थ्यांच्या घरी कामाची स्थिती तपासली. दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता जमा होऊन वर्ष उलटले असतानाही पायाभरणी नसल्यामुळे अधिकारी संतप्त झाले. अशा लाभार्थ्यांकडून निधी वसूल केला जाईल, घरकुल रद्द केले जाईल, असा इशारा नेवासे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी दिला आहे.

घरकुल

लाभार्थ्यांना मुदत द्या : सोनटक्के

नेवासा बुद्रुक येथील सरपंच सोनटक्के यांच्या कारकिर्दीत नेवासा बुद्रुक येथे ४०७ घरकुलांना विक्रमी मंजुरी मिळवून दिली. अनेक लाभार्थी हे अत्यंत गरीब असल्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. गावात एकाच वेळी एवढ्या प्रमाणात बांधकामासाठी कामगार उपलब्ध नव्हते. घरकुल बांधणीसाठी वाळूचीही कमतरता व पाणी टंचाई होती. आता त्यांना मुदत द्या, अशी मागणी माजी सरपंच सोनटक्के यांनी केली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घरकुल
घरकुल
घरकुल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घरकुल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!