पाचेगाव फाटा (वार्ताहर)नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील श्री गहिनीनाथ महाराज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड पाचेगाव या संस्थेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी प्रसिद्ध करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर गावातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना यादी संस्थेच्या माध्यमातून लावण्यात येऊन लाभार्थी शेतकऱ्यांना पाहायला मिळाली.त्यात ज्या लाभार्थ्यांची नावे या यादीत आहे,अश्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन आपली के वाय सी करणे बंधनकारक आहे.त्यात या योजनेचा पाचेगाव येथील संस्थेचे १६४ सभासद पात्र असून पहिल्या यादीत १११ सभासद लाभार्थ्यांचे नावे आली असून उर्वरित ५४ सभासद लाभार्थी दुसऱ्या यादीत येणार आहे.
तसेच प्रसिद्ध झालेली यादी मध्ये ज्या सभासदांनी आपल्या कर्ज खात्याची रकमेची संस्थेत प्रत्यक्ष खात्री व आपली रक्कम कमी अगर जास्त झाल्यास संस्थेला दोषी धरू नये,त्यामुळे सर्व शहानिशा करूनच आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे पाचेगाव, कारवाडी,पुनतगाव आदी गावातील सचिव यांनी आपल्या संस्थेतील प्रसिद्ध यादीतील सभासदांना व लाभार्थ्यांना सूचना केल्या आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची पहिली यादी प्रसिद्ध करताना पाचेगाव येथील सरपंच वामनराव तुवर,संस्थेचे अध्यक्ष भगीरथ पवार,संचालक दत्तात्रय पाटील,पाचेगाव संस्थेचे सचिव संजय उंडे,पुनतगाव संस्थेचे सचिव संजय नांदे,गंगाधर मतकर,जालिंदर विधाटे,अशोक जाधव,लखन मतकर,बंडूनाना सोमवंशी आदी उपस्थित होते.
सध्या तालुक्यात सर्व सहकारी संस्था व राष्ट्रीयकृत बँकेच्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आले असून त्या पात्र लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन आपली के वाय सी करणे बंधनकारक आहे.पण पात्र लाभार्थी शेतकरी के वाय सी साइड सध्या बंद आहे.शनिवारी काहीकाळ ही साइड सुरू होती,त्यात काही लाभार्थींची के वाय सी पूर्ण झाली आहे.त्यामुळे पात्र लाभार्थीना याबाबत सविस्तर मार्गदर्शन व माहिती देणे गरजेचे आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







