यावेळी मित्र मंडळाच्या वतीने दिंडीत सहभागी झालेली भाविकांना अल्पोपहार
पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव ते मोहटादेवी दिंडीचे प्रस्थान दि २७ जुलै वार सोमवार झाले.गावातील मा.उपसरपंच बंडोपंत चौगुले व मित्र मंडळ यांच्या वतीने बेलपिंपळगाव फाटा येथे दिंडीचे स्वागत करण्यात आले.

बंडोपंत चौगुले यांच्यावतीने दिंडीस बिस्कीट पुडे वाटप करून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.यावेळी दिंडीच्या वतीने बंडोपंत चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेलपिंपळगावचे माजी उपसरपंच बंडोपंत चौगुले, शेतकरी संघटनेचे प्रभारी व प्रवक्ते प्रा.कार्लस साठे, हनुमंतराव वाकचौरे, मुमताज सय्यद,उद्योजक रेवणाथ कांगुणे, संदीप कोकणे,संदीप गटकळ,सुनील दारकुंडे,दिंडी चालक शिवाजी शिंदे, बाबासाहेब गायकवाड,

बाळासाहेब गटकळ आदीसह महिला पुरुष भाविकांना सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मा उपसरपंच बंडूपंत चौगुले हे कायमस्वरूपी असेच उपक्रम राबवित असतात, या अगोदर देखील दिंडी जाणाऱ्या भाविकांना रेनकोट वाटप केले होते.काहींना काही या धार्मिक उपक्रमात त्यांचा कायमस्वरूपी मदतीचा हात पुढे असल्याने दिंडीतील भाविकांनी समाधान व्यक्त केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







