आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
विश्वमांगल्य
विश्वमांगल्य

देवगड – देवगड येथे विश्वमांगल्य सभेचा भव्य उद्घाटन समारंभ आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला परम पूजनीय अखंड सौभाग्यवती रेणुकामाई सभाचार्य यांच्या पावन उपस्थितीने विशेष आध्यात्मिक उंची लाभली.

विश्वमांगल्य

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री छ.संभाजीनगर जिल्ह्याचे मा.श्री संजयजी शिरसाठ साहेब उपस्थित होते. तसेच स्पेशल ऑलिंपिक अहिल्यानगरच्या अध्यक्षा सिंधुताई ए. विखे पाटील, रणरागिनी महिला मंडळाच्या मा.सौ. धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील, सौ. रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील व सामाजिक कार्यकर्त्या छ.संभाजीनगर येथील श्रीमती विजया संजय शिरसाठ यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

विश्वमांगल्य

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. वृषाली जोशी (राष्ट्रीय संघटन मंत्री, विश्वमांगल्य सभा), श्रीमती नलिनी हावरे (राष्ट्रीय उपाध्यक्ष, विश्वमांगल्य सभा) तसेच श्रीमती भारती पठाडे (देवगिरी प्रांत अध्यक्षा, विश्वमांगल्य सभा) उपस्थित होत्या.

विश्वमांगल्य

या उद्घाटन सोहळ्यास महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय, उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विश्वमांगल्य
विश्वमांगल्य

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विश्वमांगल्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!