
नेवासा – शहरातील विद्यार्थी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी ‘सृजन कट्टा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी नेवासा व परिसरातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची एक छोटी बैठक आज हॉटेल कृष्णा येथे पार पडली.

या बैठकीत दर रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत हॉटेल कृष्णा येथे एकत्र येऊन वाचन, लेखन, चित्रकला तसेच विविध सर्जनशील छंद जोपासण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक विचारांची देवाणघेवाण, व्यक्तिमत्व विकास आणि सर्जनशीलतेला चालना देण्याचा उद्देश आहे.
विशेष म्हणजे, हा उपक्रम सर्वांसाठी खुला आणि पूर्णतः मोफत असून, मुले, मुली, महिला आणि पालकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

इच्छुक नागरिकांनी पुढील रविवारी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सृजन कट्टा, नेवासा’तर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क: 9960613961.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







