
पाचेगाव फाटा : नेवासा तालुक्यातील जैनपूररचे भूमिपुत्र रायभान महाराज डिके नाना पैठण अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जैनपूर येथील सार्वजनिक वाचनालय साठी तब्बल २०० पुस्तके भेट दिली आहे.

वाचन संस्कृती रुजवण्यासाठी वाचनालयाला पुस्तके भेट देणे हा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला आहे.अनेकदा नागरिक, संस्था किंवा लेखक आपल्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथालयांना कथा, कादंबऱ्या आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट देतात. अशा उपक्रमांमुळे वाचनालयातील पुस्तकांचा संग्रह वाढतो आणि वाचकांना नवीन पुस्तके उपलब्ध मिळतात.तसेच वाचन संस्कृती वाढवणे आणि दुर्गम भागातील वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचवणे हाच उद्देश रायभान महाराज डिके यांनी डोळ्यासमोर ठेवून राबवला.
रायभान महाराज डिके यांनी सामाजिक भान जपून आपल्या वाढदिवसानिमित्त वाचन चळवळ वाढण्यासाठी जैनपूर येथिल सार्वजनिकवाचनालयास विवीध प्रकारची २०० पुस्तक भेट देवून आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याने जैनपूर येथील ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक व आभार व्यक्त केले.
सध्या हनुमान मंदिर नविन गावठान परिसरात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. रायभान महाराज डिके यांची सात दिवस महाभारत कथा चालू आहे. डिके महाराज यांनी आपल्या जन्मभूमीतील कार्यक्रमास कायमच सढळ हाताने कायमस्वरूपी मदतीचा हात देतात.त्यांच्या वाढदिवसा निमीत्ताने महाराजांनी वाचनालयास पुस्तक भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. विवीध प्रकारची पुस्तके भेट दिल्याने तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण होऊन भविष्यात येणाऱ्या संकटाला मात करण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

जैनपूर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री ग्रामपंचायत राज मध्ये सहभाग घेत हा चांगला उपक्रम ग्रामपंचायत व लोकसहभागातून राबवून वाचनालय उभे केले आहे.याचे लवकरच उदघाटन करण्यात येणार आहे,तोच गावातील ग्रामस्थ भरभरून प्रतिसाद देत पुस्तके उपलब्ध करून देत आहे.यात दिनकर डिके यांनी २१ तर ग्रामपंचायतीने देखील २८० पुस्तके खरेदी केली आहे,त्यामुळे वाचनालय मध्ये जवळपास ५०० पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध झाली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







