नेवासा : गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेला नेवासा शहराचा पाणीप्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आ. विठ्ठलराव लंघे यांच्या प्रयत्नांतून पाणीपुरवठा यंत्रणेचे
आधुनिकीकरण सुरू असून, नवीन उच्च क्षमतेच्या मोटारी आणि ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम वेगात सुरू आहे.
प्रेशर मोटार बसवण्यात आली आहे. या मोटारीची क्षमता ताशी सुमारे ३ लाख २५ हजार लिटर पाणी उपसण्याची असल्याने पाणीपुरवठ्यात मोठी सुधारणा अपेक्षित आहे.प्रवरा-संगम गोदावरी नदीवरील जॅकवेलवर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून जुन्या आणि वारंवार नादुरुस्त होणाऱ्या मोटारी वापरात होत्या.

त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. ही अडचण लक्षात घेऊन १५० हॉर्स पॉवरची नवीन हाय प्रेशर मोटर बसविण्यात आले आहे पाणीपुरवठ्यातील अडथळे दूर करण्यासाठी ३१५ केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू आहे.
नेवासकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, हा आमचा प्रयत्न आहे. जुन्या यंत्रणेत बदल करून उच्च क्षमतेची साधने बसवली आहेत. लवकरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल.
– विठ्ठलराव लंघे, आमदार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






