घोडेगाव – सोनई पोलिस स्टेशन हद्दीतील घोडेगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे, या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुक्ताबाई रामकिसन शिदोरे (वय ६५, , रा. घोडेगाव, ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय सुधाकर शिदोरे व अलका सुधाकर शिदोरे (रा. घोडेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. ३० रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोरील पटांगणात घडली. फिर्यादी आपल्या घरासमोरील पटांगणात वीटा उचलत असताना आरोपी तेथे आले. त्यांनी “ही वीट का उचलतेस” असा जाब विचारत वाद घातला. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली.

या वादाचे रूपांतर पुढे मारहाणीत झाले. आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच पटांगणातील वीट उचलून फिर्यादीच्या पाठीवर व कमरेवर मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच आरोपी महिलेने फिर्यादीच्या हातातील विळा काढून घेऊन तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर वार करून जखमी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेत फिर्यादी जखमी झाल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारहाणीत वीट व विळा यांचा वापर झाल्याची नोंद आहे. घटनेनंतर फिर्यादीने सोनई पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा र न १०३/२०२६ अंतर्गत भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करीत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







