नेवासा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मीआई वरखेडचा यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता घेऊ. तसेच भाविकांना सुविधा योग्य पद्धतीने कशा उपलब्ध होतील यासाठी प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन आ. विठ्ठलराव लंघे यांनी केले.
तालुक्यातील वरखेड येथे दि. ७एप्रिल रोजी होणाऱ्या लक्ष्मीआईच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आ. लंघे यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्याच्या अधिकाऱ्यांच्या समवेत नियोजन बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी तहसीलदार डॉ. संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल,पोलिस निरीक्षक महेश पाटील, दलित बहुजन चळवळीतील नेते सुधीर वैरागर, देवस्थानचे अध्यक्ष कडूबाळ गोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी तहसीलदार डॉ. बिरादार यांनी प्रास्ताविकात प्रशासकीय पातळीवर विविध सुविधा भाविकांना उपलब्ध होण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे सांगितले.
आ. लंघे म्हणाले की, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने वरखेड शिरसगाव हा रस्ता मंजूर केला असून, यात्रेकरिता सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपापली जबाबदारी व कर्तव्य चोखपणे बजावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी यात्रेच्या परिसराची पोलिस यंत्रणेसह प्रत्यक्ष पाहणी केली असून, यात्रा काळात अवैध धंद्यांवर कारवाई केली जाईल, तसेच दादागिरी, दहशत खपवून घेतली जाणार नाही त्यासाठी कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
लक्ष्मी आई वरखेड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष्मीआई मंदिरासह परिसरात एकूण १६ सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले असल्याने मंदिर प्रांगणात गैरप्रकार करणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






