आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वरखेड
वरखेड

सलाबतपूर – नेवासा तालुक्यातील वरखेड येथे श्री लक्ष्मी देवीची वार्षिक यात्रा मंगळवार, ७ एप्रिल रोजी उत्साहात पार पडणार असून यात्रेसाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

यात्रेदरम्यान सुव्यवस्था राखण्यासाठी मंदिर परिसरात एकूण १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कडूपाटील गोरे यांनी दिली. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली आहे.

वरखेड

यात्रेनिमित्त छबीना व आकर्षक दारुकाम (फटाक्यांची आतषबाजी) आयोजित करण्यात आली असून यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क राहणार आहे.

तसेच, मंगळवारी सकाळी ११ वाजता पैठण येथून कहार व भोई समाजाच्या वतीने आणण्यात आलेल्या पालखीची पूजा ट्रस्टी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

वरखेड

यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी नेवासा एसटी डेपोमार्फत जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक भाविकांनी यात्रेला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कडूपाटील गोरे व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

वरखेड

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वरखेड
वरखेड
वरखेड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!