आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बनावट कागदपत्रे
हाणामारी

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील लोहगाव शेतीच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे याबाबत पहिली फिर्याद प्रमोद पंढरीनाथ पटारे वय २१ यांनी दिली असून या फिर्यादीनुसार सतीश रघुनाथ पटारे, रघुनाथ चंद्रभान पटारे, आणि संगीता रघुनाथ पटारे सर्व राहणार लोहगाव यांनी एकत्र येऊन फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला.

हाणामारी

ही घटना दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर घडली फिर्यादी हे शेतातून घरी परतत असताना सतीश पटारे यांनी आमच्या शेतातून जाऊ नको अशी दमदाटी केली त्यानंतर झालेल्या वादातून आरोपींनी मिरचीची पूड फेकून चाकू व लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे यावरील फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गु र न108/2026 भारतीय दंड संहिता कलम११८/१/,११५/२/,३५२, ३५१/२/३/३/५/ अन्वये गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार पवार हे करत आहे, तर दुसरी फिर्याद रघुनाथ चंद्रभान पटारे वय ४७ राहणार लोहगाव यांनी दिली दिलेल्या फिर्यादीवरून पंढरीनाथ विठ्ठल पटारे, प्रमोद पंढरीनाथ पटारे, अंजना पंढरीनाथ पटारे सर्व राहणार लोहगाव घटनेच्या दिवशी फिर्यादी आपल्या शेतात असताना शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून आरोपीशी वाद झाला वाद विकोपाला जाऊन आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत धमक्या दिल्या.

हाणामारी

त्यानंतर आरोपी यांनी हातातील लोखंडी गाजाने फिर्यादी व त्यांच्या बरोबर असलेल्या व्यक्तीवरहल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या हल्ल्यात रघुनाथ चंद्रभान पटारे, सतीश रघुनाथ पटारे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायावर व डोक्यावर गंभीर दुखापत झाल्या आहेत जखमींना तातडीने अहिल्यानगर येथील सिविल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे उपचारादरम्यान जखमीने दिलेल्या जबाब वरून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हाणामारी

आरोपींनी पुन्हा शेतात आला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ११८/१/,११५/२/,३५२,३५१/२/३//३/५/अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी अधिकच्या पास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब राख हे करत आहेत.

हाणामारी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हाणामारी
हाणामारी
हाणामारी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हाणामारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!