घोडेगाव — घोडेगाव (ता. नेवासा) येथे श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सव ४ एप्रिल ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची विविधता पाहायला मिळणार आहे. श्री घोडेश्वरी देवी यात्रा उत्सव हा जिल्ह्यातील एक नावाजलेला व प्रसिद्ध यात्रोत्सव असून राज्यातील तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दाखल होत असतात. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी उपस्थित राहतात. पारंपरिक धार्मिक वातावरण, उत्साह आणि भक्तिभाव यामुळे हा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो.

महोत्सवातील तीन दिवसीय कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असून तो अनुक्रमे ४, ५ आणि ६ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
४ एप्रिल रोजी ह.भ.प. कविराज महाराज झावरे (पारनेर) यांचे कीर्तन, ५ एप्रिल रोजी ह.भ.प. प्रल्हाद महाराज कळमसरे (पाचोरा, जळगाव) यांचे कीर्तन, ६ एप्रिल रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे कीर्तन होणार आहे.
मंगळवार (७ एप्रिल) रोजी पहाटे कावडी मिरवणूक, सकाळी देवीची पूजा आणि रात्री भव्य छबीना (पालखी मिरवणूक) काढण्यात येणार आहे. याच दिवशी आतिषबाजीचा सामना आणि आनंद महाजन जळगावकर यांचा लोकनाट्य तमाशा मोफत वसादर केला जाणार आहे.

बुधवार (८ एप्रिल) रोजी ‘भव्य जंगी हंगामा’ हे महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे.
याच दिवशी रात्री ९ वाजता पद्मश्री पुरस्कार विजेते रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर यांचे लोकनाट्य सादरीकरण मोफत होणार असून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
गुरुवार (९ एप्रिल) रोजी “माहेरची पाहुणी” हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.
सर्व कार्यक्रम श्री घोडेश्वरी देवी मंदिर परिसर, घोडेगाव येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री घोडेश्वरी देवी यात्रा महोत्सव कमिटी, घोडेगाव यांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







